मंगलम पार्क येथे सुरू असलेल्या मटका अड्डयावर पोलिसांची धाड
9 जणांना अटक, सुसज्ज फ्लॅटमधूूून चालायचा मटका
जितेंद्र कोठारी, वणी: येथील एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकून 9 जणांना ताब्यात घेतले. आज बुधवारी दुपारी 3 वाजता दरम्यान डिवायएसपी व डीबी पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई पार पाडली.
ठाणेदार वैभव जाधव यांना मंगलम पार्क 1 मधील आर.के. अपार्टमेंटच्या 201 न. फ्लॅटमधून मटका सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव यांच्या नेतृत्वात पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी फ्लॅटमध्ये नऊ व्यक्ती मटका पट्टी उतारा घेताना आढळून आले.
पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 प्रिंटर, 15 मोबाईल, 3 दुचाकीसह मटका पट्या व इतर साहित्य जप्त केले आहे. अटक केलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे पथकाने एका बिल्डरच्या कार्यालयात सुरु असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकून बिल्डरसह चार जणांना अटक केली होती.