सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: इर्वीन हाॅस्पिटल अर्थात जिल्हा रुग्णालयात ती कोरोनायोद्धा म्हणून लढत होती. दरम्यान अचानक ती आजारी पडली. चेकअप झाल्यावर तिचे रिपोर्टस् पॉझिटिव्ह येतात. तिला काेविड वार्डा मध्ये भरती करण्यात आले, दोन तीन दिवसांत प्रकृती चिंताजनक झाली. डॉक्टरांनी तिला प्लाजमा देण्याची सूचना केली. या कोरोनायोद्धाचा ब्लड ग्रुप ओ निगेटीव्ह होता. ओ निगेटिव्ह रक्तगट पाच ते सात हजार यामध्ये एखाद्या व्यक्तीचा असतो.
हे रक्त मिळवणे म्हणजे मोठी कठीण बाब. व्हाट्सअप, फेसबूक आदी सोशल मीडियातून सर्वत्र रिक्वेस्ट पाठवण्यात आल्यात. तातडीने विविध संस्था संघटना प्रयत्नाला लागल्यात. स्वतः रुग्णाने जनसंपर्क अधिकारी उमेश आगरकर यांना फोन करून हकिकत सांगितली. वॉर्डातील विविध डॉक्टर, नर्सेस, अधिपरिचारिका सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केलेत. या प्रयत्नांचे फळ असे की, अखेर त्या रुग्णाला या ब्लडग्रुपचे रक्त मिळाले.
उमेश आगरकर जनसंपर्क अधिकारी यांनी केवळ जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरही यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा, नागपूरयेथील सर्व ब्लडबँकांना ओ निगेटिव्ह प्लाजमाची डिमांड झाली. परंतु कोठेही रक्त उपलब्ध होत नसल्याचे माहीत पडले. दिवसाखेर अमरावतीमध्ये काेराेनाशी लढून पूर्णपणे बरे झालेल्या एकमेव ओ निगेटिव्ह ब्लडग्रुपचे कोरोनायोद्धा असलेले महेशभाई हरवानी यांना मनीष दारा, पवन भुतडा, अमीत करवा, जयपाल उत्तमानी, रक्तपेढी व रुग्ण नातेवाईक या माध्यमातून संपर्क झालेत. रात्री ठीक 11 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने उमेश आगरकर, अनिल पिंजरकर, हरीश ब्रदर यांनी महेश हरवानी यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन संवाद साधला. प्लाजमा डोनेशन संदर्भात चर्चा केली.
आवश्यक तपासण्यांकरिता रक्तनमुने घेतलेत. जेणेकरून सकाळी तात्काळ रक्तसंकलन करता येईल. सकाळी महेश हरवाणी यांना स्वतः मनीष दारा, जयपाल उत्तमाणी यांच्यासह रक्तपेढीमध्ये उपलब्ध झालेत. यावेळेस दिनेश बूब रक्तदान समितीच्या वतीने पवन भुतडा, अमीत करवा व अन्य रक्तदात्यांच्या प्रतीक्षेत उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये हे प्लाजमा डोनेशन यशस्वी झाले.
रक्त संकलनाच्या कार्यात डॉ. आशीष वाघमारे, डॉ. श्रीकांत झापर्डे, सचिन काकडे, मंगेश गाढवे, पूजा हजारे, संगीता गायधने, उमेश आगरकर, अनील पिंजरकर, हरीश ब्रदर, प्रीती तायडे, रिया हरवानी यांचे विशेष योगदान राहिले. महेश हरवानी यांचे प्लाजमा डोनेशनकरिता सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आभार मानले. हनवानी यांनी आतापर्यंत 45 पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले केले. परंतु एका कोराेनायाेद्धासाठी रक्तदान केल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
दिनेश बूब, रक्तदान समिति अमरावती महाराष्ट्रचे समीती सदस्य, पवन भुतडा,अमीत करवा, निल माहेश्वरी, राजाभाऊ साखरे, राजाभाऊ पिंजरकर, राजू शर्मा, अमित मोतीवाला,जयेश चांडक, अमरावती रक्तदाता बहुद्देशीय संस्थेचे जयपाल उत्तमाणी, रिया हरवानी, संकेत कावरे, बरखा बाेजे यांचे योगदान लाभले, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने उमेश आगरकर, अनील पिंजरकर, प्रीती तायडे, हरीश ब्रदर, अटाळकर तसेच विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेत. मनीष दारा यांचामुळेच महेश हरवानी यांना डोनेशनचं महत्व कळलं. हा एक आदर्श प्रयत्न असल्याचे मत व्यक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांनी व्यक्त केलं.