कुरणखेडच्या युवकांनी फुलवले गावाचे स्वप्न

स्वातंत्रदिनाला उपलब्ध करून स्वच्छतेची व्यवस्था

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील कुरणखेड हे छोटंसं गाव. इथल्या युवकांनी याला ‘ड्रीम व्हिलेज’ करण्याचा संकल्प केला. त्यांनी स्वयंस्फूर्तीने लोकसहभागातून स्वच्छतेच्या अनुशंगाने भरीव प्रयत्न केलेत. गावासाठी कचरापेटी आणि घंटागाडीची व्यवस्था केली.

गावाला सर्वांग सुंदर करण्यासाठी ही तरुणाई धडपडत आहे. गावकरीदेखील त्यांना पूर्ण सपोर्ट करीत आहेत शंतनू देशमुख, संगम जावरकर, अभिजित चौधरी, हृषिकेश तायडे, अथर्व देशमुख, अभय पाथरे, हृषिकेश पाथरे, राम देशमुख, अजय राऊत, अमय जावरकर, मेहर देशमुख, कार्तिक देशमुख, वेदांत तायडे, अभय राऊत, तनय देशमुख आणि मित्रपरिवार हे या कार्यासाठी झटत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.