मानोरा: परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात सार्वत्रिक नुकसान झालेले आहे आता सगळीकडे पंचनामे करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. पण पंचनामा झाल्यानंतर खरोखरच शासन न्याय देईल का? याबाबत शंका आहे, तरी शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी डॉक्टर श्याम जाधव नाईक यांनी निवेदनातून केली.
सव्वातीन लाख शेतकऱ्यांपैकी 50 टक्के पेक्षा कमी शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याचे बोलले जात आहे ज्यांचा आपल्या भागात तेरा नाही अशाच पिकांचा विमा जाहीर केला आहे पिक कर्ज देताना सुद्धा बँकांचा हाताखालील आहे फक्त नुकसान भरपाई करू याचे प्रलोभन पंचनामा च्या माध्यमातून पंचनामा च्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे जाणूकाही शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचे काम हे शासन करत आहे.
पेरे पत्रानुसार सरसकट मदत जाहीर न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय शेतकऱ्यांसमोर राहिला नाही. यावर शासनाने त्वरित कार्यवाही करावी अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही असे डॉक्टर श्याम जाधव यांनी निवेदनातून नमूद केले आहे.