गोकुळपेठमध्ये नॅचरोपॅथी क्लिनिकमध्ये देहव्यापाराचा अड्डा

महिला डॉक्टरसह तिघांना अटक

0

नागपूर: नागपुरातील गोकुळपेठमधल्या विमल भास्कर अपार्टमेंटमधील दुसऱ्या माळ्यावरील केअर नॅचरोपॅथी क्लिनिकमध्ये धाड टाकून पोलिसांनी देहव्यापार अड्याचा पर्दाफाश केला आहे. मंगळवारी पोलिसांनी या अड्यावर धाड टाकून महिला डॉक्टरसह तिघांना अटक केली आहे. नॅचरोपॅथीच्या नावाखाली इथं देहव्यापाराचचा धंडा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी धाड टाकून हा गोरखधंडा उघडकीस आणला. येथून चार तरुणींची सुटका करण्यात आली. डॉ. प्रीती निखील शर्मा, मीनाक्षी ऊर्फ मीना पंढरी खारकर व मोहसीन खान सना खान,अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

Podar School 2025

मीनाने अपार्टमेंटमधील दुसऱ्या माळ्यावर नॅचरोपॅथी क्लिनिक सुरू केले होते. येथे गत अनेक महिन्यांपासून बिनधास्तपणे देहव्यापार सुरू होता. याबाबत तक्रार येताच पोलिस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशमन यांनी छापा टाकण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांना दिले. पथकाने मंगळवारी बनावट ग्राहक क्लिनिकमध्ये पाठविला. त्याच्याकडून सिग्नल मिळताच पोलिसांनी धाड टाकली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

(प्रियकर पळाला प्रेयसीला गर्भवती करून, पोलिसांनी दिलं दोघांचं लग्न लावून)

खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या सहायक पोलिस निरीक्षक अमिता जयपूरकर,अनुपमा जगताप, संजिवनी थोरात, हेडकॉन्स्टेबल पांडुरंग निकुरे, सहायक उपनिरीक्षक बळीराम रेवतकर यांनी अंबाझरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.एम.खणदाळे यांच्या उपस्थितीत छापा टाकला. तिघांना अटक करून, चार तरुणींची सुटका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.