विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती साजरी

सुत्तपठन आणि विविध कार्यक्रमांचे झाले आयोजन

0

 

विवेक तोटेवार, वणी: भारतीय बौध्द महासभा वणी तालुक्याच्या वतीने दिनांक 14 एप्रिल 2021 सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वणी येथे भारतीय बौद्ध महासभा वणीच्या वतीने अभिवादन आणि सुत्तपठन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बौध्द महासभेचे अध्यक्ष प्रवीण वनकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मेणबत्ती आणि अगरबत्ती लावून पूजन केले. भारतीय बौध्द महासभेच्या महिला शाखा अध्यक्षा: सुचिता पटिल ,सचिव: वैशाली पटिल , उपाध्यक्ष: करुणा कांबळे, कोषाध्यक्ष :अर्चना कांबळे ,केंद्रीय शिक्षिका: विद्या भगत ,तुडसा नगराले ,केंद्रीय शिक्षिका: ललिता तेलतुम्बडे तसेच सर्व वार्डाच्या प्रतिनिधीनी आणि समता सैनिक दलाचे गौतम जीवने, संस्कार तेलतुम्बडे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगल तेलंग, मिलिंद पटील ,दिलीप भोयर , झीया अहेमद ,किशोर मून आणि दादाजी घडले ,गजानन रामटेके यांनी हार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली.

सामूहिक सुत्तपठन घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासचिव रमेश तेलंग ( केंद्रीय शिक्षक)यांनी केले. शरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.

हेदेखील वाचा

प्रतिबंधित तंबाकूची विक्री करणाऱ्यावर कारवाई:

हेदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

Leave A Reply

Your email address will not be published.