संजय देरकर यांच्या नेतृत्वात तरुणांनी बांधले शिवबंधन

15 युवकांनी केला शिवसेनेत पक्ष प्रवेश

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीत शिवसेना नेते संजय देरकर यांच्या नेतृत्वात आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी 15 युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. संजय देरकर यांच्या घरी एका साध्या कार्यक्रमात नायगाव, दांडगाव व वणी येथील तरुणांनी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला.

Podar School 2025

अरविंद तुराणकर, गणेश तुराणकर, नंदकिशोर मंगाम, सुमित सुतसोनकर, विक्रांत अलोने, सुरेश मत्ते, सचिन बोबडे, वरारकर इ्त्यादींनी पक्षप्रवेश केला. येत्या काळात नगर पालिका, नगर पंचायत व जिल्हा परिषद निवडणूक आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीच्या उद्देशाने सध्या शिवसेना नेते संजय देरकर यांनी कंबर कसली आहे. खेडोपाडी जाऊन ते तरुणांची भेट घेऊन त्यांना पक्षात येण्याचे आवाहन करीत आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व संजय देरकर यांच्या नेतृत्त्वात पक्ष अधिकाधिक बळकट करेल असे मनोगत यावेळी पक्षप्रवेश केलेल्या शिवसैनिकांनी व्यक्त केले. यावेळी दीपक कोकस, राजू तुराणकर, अविनाश भूजबलराव, सुशील मुथा, प्रशांत पाचभाई, अजिंक्य शेंडे, मंगल भोंगळे यांच्यासह मोठ्या संख्यने शिवसैनिक उपस्थित होते.

हे देखील वाचा:

Comments are closed.