विवेक तोटेवार, वणी: फिरायला जाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र फिरायला जाणे एका वणीकराला चांगलेच महागात पडले. ग्राउंडच्या गेटवर दुचाकी लावून फिरण्यासाठी गेलेल्या एकाची दुचाकी चोरट्याने लंपास केली. शहरात सातत्याने होणा-या दुचाकी चोरीच्या घटनामुळे वणीकर चांगलेच त्रस्त झाले आहे. नवीन ठाणेदारांपुढे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान आहे.
सुनिल उद्धव गेडाम (45) हे वणीतील वसंतगंगा विहार येथे राहत असून ते लोकमान्य टिळक महाविद्यालय येथे शिक्षक आहेत. त्यांच्याकडे होंडा कंपनीची शाईन (MH34 AE3997) हि दुचाकी आहे. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी ते संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास पाण्याच्या टाकी जवळील ग्राउंडवर फिरण्याकरिता आले. त्यांनी त्यांची दुचाकी ग्राउंडच्या कम्पाउंडजवळ लावली व ते फिरण्यासाठी गेले.
अर्ध्या तासाने ते परत आले असता ठेवलेल्या ठिकाणी त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी दोन तीन दिवस दुचाकीचा शोध घेतला मात्र दुचाकी आढळून आली नाही. अखेर त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
हे देखील वाचा:
रंगारीपु-यात रंगला थरार… सिनेस्टाईल पाठलाग करून चोरट्यास पकडले
Comments are closed.