भास्कर राऊत, मारेगाव: कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा-या तरुणाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अविनाश जीवन मेश्राम वय 28 असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव आहे. दोन दिवसांआधी त्याने कीटकनाशक प्राशन केले होते. नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
अविनाश जीवन मेश्राम हा वेगाव येथील रहिवाशी होता. तो शेती करायचा. गुरुवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी अविनाश याने घरी कुणी नसताना मोनोसील हे विषारी औषध प्राशन केले. याची माहिती कुटुंबियांना मिळताच कुटुंबियांनी तातडीने त्याला उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र त्याची प्रकूर्ती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. अविनाश याच्या वडिलांच्या नावाने वेगाव येथे सामायिक 7/12 वर शेती आहे. अविनाश यांच्या पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी, एक मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे. अविनाशने आत्महत्या का केली याचे कारण गुलदस्त आहे. मात्र त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जाता आहे. सदर प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करत आहेत.
तालुक्यातील वाढत्या आत्महत्या ह्या चिंतेचा विषय आहे. दर आठवड्यात दोन आत्महत्या मारेगाव तालुक्यात होत आहे. यावर प्रतिबंध होण्यापेक्षा त्या वाढतच असल्याने तालुक्यामध्ये नेमके काय सुरु आहे यावर मंथन होणे गरजेचे आहे. परंतु अद्यापही यासाठी कोणीही पुढाकार घेतला नसल्याने तालुक्याची समोर काय गत होईल हे सांगता येत नाही.
हे देखील वाचा:
चक्क पत्रकार पतीनेच दिली शिक्षक पत्नीला जीवे मारण्याची सुपारी
लाल सिंग चढ्ढा, रक्षाबंधन सिनेमाला झोपवणारा ‘कार्तिकेय 2’ वणीत रिलिज
Comments are closed.