पालकमंत्री शेतशिवार योजनेंतर्गत पांदणरस्त्यांची कामे त्वरित करा

अडेगाव ग्रामवासीयांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

0

सुशील ओझा, झरी:  तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं गाव म्हणून अडेगावला गणले जाते. गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे11 सदस्यीय ग्रामपंचायत आहे. परंतु एवढ्या मोठ्या गावात विविध ठिकाणच्या पांदणरस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

Podar School 2025

अनेक रस्ते दिसेनासे झालेत. तर अनेक रस्त्यांनी साधी बैलगाडी व दुचाकी जाणेदेखील कठीण झाले आहे. तरी ग्रामपंचायतीने पालकमंत्री शेत / पांदणरस्ते योजनेंतर्गत २०२०-२१ अंतर्गत पांदणरस्त्यांचे काम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अडेगाव येथील माया चिकटे यांच्या शेतापासून ते संभाजी पारखी यांच्या शेतापर्यंत (मुकुटबन), मोहन पानघाटे (शिवधुरा) यांच्या शेतापासून पांदणरस्ता ते लटारी दातारकर यांच्या (पिंपरड रोड)पर्यंत, धनंजय पाचभाई (आमलोन रोड) यांच्या शेतापासून ते नामदेव पानघाटे यांच्यापर्यंत (शिवधुरा), गजानन धानोरकर यांच्या शेतापासून तर नामदेव लोढे यांच्या शेतापर्यंत व रामदास आसुटकर यांच्या शेतापासून तर अरुण काटकर यांच्या शेतापर्यंत रोड बनविण्याची मागणी करण्यात आली.

या रस्त्यांच्या कामाकरिता ग्रामपंचायतीमध्ये 17 नोव्हेंबर रोजी मासिक सभेत प्रशासक चंदा रामराव गडमवार यांच्या अध्यक्षतेखाली सचिव प्रांजली वाढई यांच्या उपस्थितीत सभा झाली. वरील रस्त्यांच्या विषयावर चर्चा करण्यात आली होती. पांदण रस्ते बांधकामे गट अ, गट ब, व गट क अशा प्रकारांमध्ये घेण्याचे प्रस्तावितसुद्धा करण्यात आले.

सन २०२०-२१ च्या तालुका कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमाल व वाहतुकीकरीता रस्ता आवश्यक असल्याचे नोंद करून ठरवासुद्धा मंजूर करण्यात आला आहे. या सर्व रस्त्यांची कामे ग्रामपंचायतने लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,

अशी मागणी डॉ. मारोती मासिरकर, अभय पानघाटे, दिलीप उरकुडे, राहुल निखाडे, भगवान पानघाटे, प्रवीण मासिरकर, विठ्ठल ठेंगणे, शंकर गडकर, अशोक ठाकरे, आस्तिक चिंचोळकर, संतोष ठाकरे, पुंडलिक ठाकरे व संतोष सहस्त्रबुद्धे यांनी केली आहे.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

 

Leave A Reply

Your email address will not be published.