सरपंच व सामाजिक कार्यकर्त्यांची कोरोना रुग्णसेवा

गावात फवारणी केली व रुग्णांना केले फळवाटप

0

सुशील ओझा, झरी: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयात उपचारकरिता ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागत आहे. गरीब रुग्णांना मदत देण्याऐवजी अनेक लोकप्रतिनिधी व गावपुढारी घरात बसले आहे.

अडेगाव येथील कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांना मदत करीत तसेच गावातील इतर जनतेला कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेत जाऊन कोरोना रूग्णांना मदत करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रुग्णाना बेड असो की प्लाझ्मा सर्व स्तरांहून मदत करताना सामजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई दिसत असतात. अडेगाव येथील कोरोनाग्रस्त रुग्णांना मदतीचा हात म्हूणून मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांना फळे, पौष्टिक व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वस्तू वाटप करून रुग्णांना मदतीचा हात दिला.

गावातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या घरात सॅनिटायज करण्यात आले. रूग्णांना धीर देत मानसिक आधार दिला. गावातील सर्व मदतकार्याला ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष पारखी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सामाजिक कार्यात सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई, सरपंच सीमा लालसरे यांच्यासह प्रणल गोंडे, राहुल ठाकूर, विवेक पुरके, मारोती गोंडे, धनंजय पाचभाई, संजय आत्राम, राहुल पाचभाई व सर्व युवकांचे सहकार्य लाभले.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

Leave A Reply

Your email address will not be published.