नागेश रायपुरे, मारेगाव: शहरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता, मारेगाव शहरातील सर्व लहान मोठ्या व्यवसायिक दुकानदारांनी येत्या दहा दिवसांत दिनांक 12 एप्रिल पर्यंत कोरोना लसीकरण येथील ग्रामीण रुग्णालयात अथवा कोविड सेंटर वर जाऊन करावे असे आवाहन नगर पंचायत मारेगावचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाचे वतीने विविध उपाय योजना करण्यात येत आहे.शहरात कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, वृत्तपत्र विक्रेता, भाजीपाला व फळ विक्रेता, दूध विक्रेता, फेरीवाले, हेअर सलून, इतर सर्व लहान मोठ्या व्यावसायिक दुकानंदारांना प्रशासना चे वतीने कोरोनाच्या मोफत लसीकरण देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे.
येत्या 10 दिवसात 12 एप्रिल 2021 परंत रोज सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 5 दरम्यान सर्व दुकानदारांनी मोफत कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले आहे.
हे देखील वाचा: