आनंद नक्षिने यांची बारा बलुतेदार समाजाच्या मारेगाव तालुका कार्याध्यक्षपदी

मारेगाव येथे झालेल्या बारा बलुतेदार समाजाच्या बैठकीत निर्णय

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथे बारा बलुतेदार समाज कृतीसमितीची बैठक झाली. विधानसभा कार्याध्यक्ष प्रवीण खानझोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. ह्या बैठकीत आनंद नक्षिने यांची मारेगाव तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाली.

Podar School 2025

बारा बलुतेदार समाजातील संघटन का महत्वाचे आहे, यावर प्रवीण खानझोडे यांनी भूमिका मांडली. त्यासाठी आपण आपली सामाजिक जाणीव जोपासून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत असेही ते म्हणालेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तसेच गावागावात विखुरलेला समाज कसा एकत्रित करता येईल, यासाठी सर्वांनी वेळ देणं गरजेचं आहे. त्यासाठी संघटनाची बांधणी आणि अन्य विषयांवर मारेगाव येथे ही बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते आनंद नक्षिने यांची मारेगाव तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. ह्या निवडीसाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात.

बैठकीत प्रवीण खानझोडे, समन्वयक राजू तुरणकार, दीपक कोकास, प्रमोद मिलमीले तसेच मार्गदर्शक म्हणून विठ्ठल चौधरी, समन्वयक सौरभ वानखडे, अविनाश चिंचोळकर, प्रशांत नांदे, प्रसिद्धी प्रमुख भास्कर राऊत, सुभाष ताजने, विनोद मोते, अजय धांडे उपस्थित होते.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

 

Leave A Reply

Your email address will not be published.