झरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव झाले सेवानिवृत्त
31 वर्ष शेतकऱ्यांकरिता केली निस्वार्थ सेवा
सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले रमेश येल्टीवार हे सेवानिवृत्त झालेत. 31 वर्षे त्यांनी शेतकऱ्यांची निस्वार्थ सेवा केली. त्यांचा बाजार समीती कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्त सचिव रमेश येल्टीवार यांनी मारेगाव येथे १५ तर मुकुटबन येथे १६ वर्ष शेतकऱ्यांच्या हिताकरिता लढत सेवा दिली. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता ते नेहमी उभे राहायचे. समितीच्या सभापती, उपसभापती, संचालक मंडळ व कार्यालयीन कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे परिवारासारखे संबंध होते.
व्यापारी, अडते, मापारी, शेतकरी सर्वांना घेऊन काम करण्याची त्यांची सवय होती. शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न समितीच्या पदाधिकारी व संचालक मंडळांना सोबत घेऊन सोडवायचे. येल्टीवार यांना शेतकरीवर्गापासून तर समिती, व्यापारी, दलाल, मापारी सर्वच चाहत होते. ३१ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांना आजपर्यंत कोणताही डाग लागलेला नाही हे विशेष.
स्वछ व निर्मळ स्वभाव असलेले येल्टीवार अखेर ३१ डिसेंबरला ३१ वर्ष सेवा देऊन सेवानिवृत्त झाले. त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार कार्यालयीन कर्मचारी नारायण चटप, दयाकर येनगंटीवार, विठ्ठल उईके, नरसिंग चुकलवार, श्याम अरके, नरेश बहादे, विभा पेंदोर व भूमन्ना लंकुरवार यांनी केला. पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्यात.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा