पक्ष्यांना मिळाले कृत्रिम घरटे… वॉटर सप्लायजवळ उभारले ‘पक्षीतीर्थ’

स्माईल फाउंडेशनचा अभिनव उपक्रम

0

बहुगुणी डेस्क, वणी: शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्र बदलत आहे. यावर उपाय म्हणून पक्ष्यांच्या संवर्धनासाठी स्माईल फाउंडेशनतर्फे अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात परिसरातील अनेक झाडांवर कृत्रिम घरटी तयार करण्यात आली आहे. याशिवाय पक्ष्यांसाठी खाद्य व पिण्याची पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. 

शहरातील वॉटर सप्लाय जवळ स्माईल फाउंडेशन तर्फे पक्षांसाठी ‘पक्षीतीर्थ’ उभारले आहेत. या ठिकाणी पक्ष्यांसाठी सध्या 8-10 कृत्रिम घरटे बांधण्यात आले आहे. याठिकाणी दाण्यापाण्याची व्यवस्था देखील केली गेली आहे. येत्या काही दिवसात इतर ठिकाणीही पक्ष्यांसाठी अशाच कृत्रिम घरट्यांची सोय केली जाणार आहे.

या उपक्रमासाठी स्माईल फाउंडेशनचे संस्थापक सागर जाधव, पीयूष आत्राम, खुशाल मांढरे, अभिजीत देवतळे, गौरव कोरडे, सचिन जाधव, आदर्श दाढे यांच्यासह स्माइल फाउंडेशनचे सदस्य परिश्रम घेत आहे.

हे देखील वाचा:

आज तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचे शतक, 115 पॉझिटिव्ह

अवघ्या 10490 रुपयांमध्ये डेस्कटॉप कॉम्प्युटर

Leave A Reply

Your email address will not be published.