आज तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचे शतक, 115 पॉझिटिव्ह

सावधान... विनाकारण फिरणा-यांची होणार कोरोना टेस्ट

0

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 23 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने शतक पार करत उच्चांक गाठला. आज तालुक्यात 115 रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 60 रुग्ण तर ग्रामीण भागात 46 रुग्ण आहेत. याशिवाय इतर ठिकाणचे 9 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज सध्या तालक्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 517 झाली आहे. आज 27 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली. दरम्यान आज 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात 53 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असतानाही शहरात विनाकारण फिरणा-यांचा बेछुट वावर दिसून येत आहे. अशा विनाकारण फिरणा-यांची उद्यापासून कारवाई केली जाणार आहे.

आज वणी शहरात विठ्ठलवाडी, प्रगतीनगर येथे प्रत्येकी 5 रुग्ण, रंगारीपुरा येथे 4 रुग्ण, सुभाषचंद्र बोस चौक, सिंधी कॉलनी, देशमुखवाडी येथे प्रत्येकी 3 रुग्ण आढळले आहेत. देशमुखवाडी, पद्मावती नगर, रविनगर, गांधी चौक, तोटेवार ले आऊट, कोर्ट, जनता शाळे जवळ, विद्यानगरी, जैन ले आऊट, लक्ष्मी नगर येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहेत. यासह सेवानगर, तलाव रोड, जटाशंकर चौक, रेल्वे कॉर्टर, महावीर नगर, खाती चौक, ओमनगर, भगतसिंग चौक, माळीपुरा, आनंद नगर, कनक वाडी, आदर्श कॉलनी, सावरकर, चौक, पटवारी कॉलनी, बेलदारपुरा, आवारी ले आऊट, तेली फैल, वासेकर ले आऊट, पंचवटी अपार्टमेंट येथे प्रत्येकी 1 असे एकूण 60 रुग्ण आढळलेत.

ग्रामीण भागात केसुर्ली येथे सर्वाधिक 7 रुग्ण तर केसुर्ली येथे 6 रुग्ण, चिखलगाव, राजूर येथे प्रत्येकी 5, लालगुडा येथे 3 रुग्ण, सावर्ला, मंदर, हनुमान नगर, उकणी, बोरगाव येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहेत. तर वागदरा, वांजरी, निलजई, नांदेपेरा, शिंदोला, वडगाव, पेटूर, भांदेवाडा, परसोडा, झरपट येथे प्रत्येकी 1 रुग्ण असे एकूण 46 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय मारेगाव, झरी, वरोरा व पांढरकवडा तालुक्यातील प्रत्येकी 2 रुग्ण व घुग्गुस येथील एक रुग्ण वणी येथे पॉझिटिव्ह आला आहे.

आज यवतमाळ येथून 320 अहवाल प्राप्त झालेत. यात 51 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 485 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 64 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून एकाही संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले नाही. अद्याप यवतमाळहून 689 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात 517 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 27 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 450 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 40 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 2532 रुग्ण आढळून आलेत. यातील 1977 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 41 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

सावधान… विनाकारण फिरणा-यांची होणार कोरोना टेस्ट
शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यातच मृत्यूदरही वाढला आहे. मात्र त्याचा विनाकारण फिरणा-यांवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. काम नसतानाही अनेकांचा आधीसारखाच मुक्त संचार सुरू आहे. काही चौकांमध्ये तर गप्पाचे फड देखील रंगत आहे. राज्यभरात विनाकारण फिरणा-यांविरोधात मोहीम सुरू झाली आहे. यात विनाकारण फिरणा-यांची चौकातच रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेतली जाणार असून यात ते पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांची रवानगी थेट आयसोलेशन सेंटरमध्ये केली जाणार आहे. उद्यापासून या कारवाईला वणीत सुरूवात होणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

हे देखील वाचा:

अवघ्या 10490 रुपयांमध्ये डेस्कटॉप कॉम्प्युटर

पक्षांना मिळाले कृत्रिम घरटे… वॉटर सप्लायजवळ उभारले ‘पक्षीतीर्थ’

आज तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचे शतक, 115 पॉझिटिव्ह

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!