वणी बहुगुणी डेस्क: मजुरीच्या पैसे वारंवार मागत असल्याच्या रागातून एकाने एका शेतमजुरावर विळ्याने हल्ला करण्यात आला. यात मजूर जखमी झाला आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास मारेगाव येथे ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकनाथ महादेव टेकाम हे माकोळा पोड ता. मारेगाव येथील रहिवासी आहे. ते शेत मजुरी करतात. तर आरोपी जानराव मडावी (55) हा सालेभट्टी येथील रहिवासी आहे. जानराव याच्याकडे एकनाथ कामाला जात होता. जानराव याच्याकडे एकनाथचे मजुरीचे पैसे बाकी होते. त्याबाबत वारंवार विचारणा केली तरी आरोपी जानराव पैसे देत नव्हता.
दिनांक 31 डिसेंबर रोजी दिवसभर चनोडा येथील शेतात काम करून संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास एकनाथ हे वणी रोडवरील एका रेस्टॉरन्टजवळ जवळ उभे होते. दरम्यान इथे आरोपी जानराव आला. त्याने एकनाथला वारंवार पैसे का मागतो याबाबत विचारणा करत विळ्याने पाठीवर वार केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात ते जखमी झाले.
एकनाथ यांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी जानराव मडावी विरोधात भादंविच्या कलम 324 व 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.