दारु पिण्यास पैसे न दिल्याने काठीने बेदम मारहाण

भास्कर राऊत, मारेगाव: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यातून झालेल्या वादातून एकास तिघांनी काठीने मारहाण केली. तालुक्यातील मजरा येथे ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला.

Podar School 2025

तक्रारीनुसार, राजेंद्र वासुदेव मेश्राम (36) हा मजरा येथील रहिवासी आहे. तो शेतमजुरी करतो. शुक्रवारी दिनांक 10 मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास तो गावातच सुरू असलेल्या भागवत कथेत गेला होता. दरम्यान तिथे आरोपी सुमीत विठ्ठल उईके (22) आला. त्याने राजेंद्र कडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. यावर राजेंद्रने पैसे नसल्याचे कारण सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पैसे न दिल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. पैशास नकार दिल्याने चिडून आरोपीने राजेंद्रला शिविगाळ केली व तो हातात काठी घेऊन आला. त्याने काठीने राजेंद्रला मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या पाठीला व हाताला गंभीर मार लागला. ही मारहाण होत असताना घटनास्थळी आरोपीचे वडील व काका देखील काठी घेऊन आले. त्यांनी ही फिर्यादीला मारहाण करत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

घटनेच्या दुस-या फिर्यादी राजेंद्र मेश्राम याने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी सुमीत उईके, विठ्ठल उईके, सुभाष उईके यांच्या विरोधात भादंविच्या कलम 324, 504, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा मारेगाव पोलीस तपास करीत आहे.

हे देखील वाचा: 

Comments are closed.