मानवतेला काळीमा: मोठे वडिलांनी केले 10 वर्षीय चिमुकलीसोबत अश्लिल चाळे

रामपूर येथील घटना, नराधम मोठेवडिलांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

1

सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामपूर येथे एका 10 वर्षीय चिमुकलीवर तिच्याच मोठे वडिलांनी अश्लिल चाळे केल्याची मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. शनिवारी हा संतापजनक घटना घडली. याप्रकरणी मोठे वडिलांविरोधात पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. आज आरोपी नराधम मोठेवडिलांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

शनिवारी दिनांक 19 जून रोजी सकाळी रामपूर येथील एका कुटुंबातील आई व वडील आपल्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडून शेतात मजूरीकरिता गेले. चिमुकली दुपारी जेवण करून बसली असता दरम्यान मुलीचे मोठे वडील घरी आले. तिच्याजवळ येऊन त्यांनी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. या प्रकाराने पीडिता घाबरली व जोराने ओरडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चिमुकली ओरडताच मोठेवडिलांनी तिच्या तोंडाला व हातपाय दुपट्याने बांधले व पुन्हा अश्लिल चाळे केले. दरम्यान पीडित मुलीची 6 वर्षीय मैत्रिणीने तिला ताई म्हणून आवाज दिला. त्यामुळे मुलीचे मोठे बाबा घाबरले व ते उघडून पळून गेले. मैत्रीण घरी आली व तिने पीडितेच्या तोंडावरील दुपट्टा सोडला.

संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास मुलीची आई शेतातून परत आली. घरी चहा पीत असताना मुलीने आईला घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर थोड्या वेळाने तिचे वडील आले असता त्यांनाही हीच घडलेली गोष्ट मुलीने सांगितली. मुलीच्या आई-वडिलांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून घडलेली हकीकत सांगितली व दुसऱ्या दिवशी नातेवाईकांना घरी बोलावले. दुसऱ्या दिवशी रविवारी दिनांक 20 जूनला नातेवाईक दुचाकी घेऊन आले. नातेवाईकांनी घटनेबाबत विचारणा केली असता तीच माहिती पीडितेने दिली.

अखेर 21 जूनला पीडितेचे वडील व नातेवाईकांनी मुलीला घेऊन पाटण पोलीस गाठले व तक्रार दिली. यावरून आरोपी 55 वर्षीय नराधमाविरोधात भादंविच्या कलम (354) अ व (354) ब, 452 सह कलम 08, 12 बाल लैंगीक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हे दाखल केले. आज 22 जूनला आरोपीला अटक करण्यात आली. सदर प्रकरनाचा तपास ठाणेदार संगीता हेलोंडे करीत आहे.

हे देखील वाचलंत का?

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

Leave A Reply

Your email address will not be published.