बुधवारी शिरपूर येथील कैलास देवस्थान येथे रक्तदान शिबिर

गावातील व परिसरातील नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: बुधवारी दिनांक 30 जून रोजी शिरपूर येथील कैलास शिखर देवस्थान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराला सकाळी 11 वाजेपासून सुरूवात होणार आहे. परिसरातील रक्तदान करण्यासाठी इच्छुक असणा-यांनी नोंदणी करावी असे आवाहन आयोजक कैलास स्पर्धा अभ्यासगट व वाचनालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सध्या कोरोनामुळे रक्तदान शिबिरे थांबली आहेत. त्यामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा पडू शकतो. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन केले होते. शिरपूर येथेही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिरपूर आणि परिसरातील गावातील नागरिकांनी रक्तदान करावे व सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून द्यावा असे आवाहन कैलास शिखर देवस्थानचे अध्यक्ष डॉ. धीरज डाहुले व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक डॉ. अभिनव कोहळे यांनी केले आहे. अधिम माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क – 9823090983

हे देखील वाचा:

सर्वात कमी किमतीत शेतीच्या कुंपणासाठी झटका मशिन उपलब्ध

आजपासून विद्यार्थ्यांविना शाळांचा श्रीगणेशा, शाळेबद्दल चिमुरड्यांची उत्सुकता शिगेला

वणीतील विश्वशांती बुध्द विहार येथे जेष्ठ पौर्णिमा साजरी

Leave A Reply

Your email address will not be published.