विवाहित महिलेचे शोषण केल्याप्रकरणी ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून 3 वर्षांपासून अत्याचार केल्याचा आरोप

0

विवेक तोटेवार, वणी: महिलेचे पतीही अनेक वर्षांपासून सोडून गेले होते. तर आरोपीचे कुटुंबीयही बाहेरगावी राहत असल्याचे तो ही घरी एकटाच राहायचा. दोघांची एका कामानिमित्त ओळख झाली. पुढे त्यांच्यात शारीरिक संबंध आले. मात्र आरोपीने लग्न करण्यास नकार दिली. त्यामुळे पीडितेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आरोपीचे नाव मनोजकुमार अभिमन्यू तिरपुडे (50) असून तो वणी तालुक्यातील वागदरा येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, पीडित महिला (36) ही दुस-या तालुक्यात राहते. तिचे पती 2007 पासून बेपत्ता असल्याने ती आपल्या 2 मुलासह राहायची. ती बचत गटात काम करते. 2018 साली ती बचत गटाच्या कामानिमित्त मारेगाव येथे गेली असता तिचे आरोपी ग्रामसेवक मनोजकुमार अभिमन्यू तिरपुडे (50) रा. प्रगती नगर वणी याच्याशी ओळख झाली. आरोपी तेव्हा मारेगाव तालुक्यातील एका गावात ग्रामसेवक म्हणून काम करायचा.

दरम्यान आरोपीची वणी तालुक्यात बदली झाली. कुटुंबीय बाहेरगावी असल्याने तो वणी येथील प्रगती नगर येथे रुम किरायाने करून राहायचा. दरम्यान आरोपी पीडिताला खोलीवर बोलवायचा व तिथे तो पीडितेचे लैंगिक शोषण करायचा.

गेल्या तीन वर्षांपासून आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून शोषण केले असा पीडितेचा आरोप आहे. मात्र अलिकडे आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे पीडितेने पोलीस स्टेशन गाठले व आरोपी मनोजकुमार अभिमन्यू तिरपुडे (50) याच्या विरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपी विरोधात भादंविच्या कलम 376 (2) (N), 417 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे करीत आहे.

हे देखील वाचा:

मुलाचे हैवानी कृत्य… ब्राह्मणी परिसरात जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार

रंगनाथ स्वामी पथसंस्थेच्या नवीन शाखेचे रविवारी उद्घाटन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.