तूर व रोख रक्कम चोरणारे दोघे गजाआड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: घरात ठेवलेली 50 किलो तूर व 5 हजारांची रक्कम लंपास करणा-या दोघांना वणी पोलिसांनी गजाआड केले आहे. चिखलगाव येथे शनिवारी दिनांक 18 मार्च रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सविस्तर वृत्त असे की दिनेश बदखल हे चिखलगाव येथील रहिवासी आहे. त्यांच्या घरी चार दिवसांआधी दिनांक 18 मार्च रोजी चोरी झाली होती. या चोरीत चोरट्यांनी घरात ठेवलेली 5 हजारांची रक्कम व घरात साठवून ठेवलेली 50 किलो तूर लंपास केली होती. या प्रकरणी बदखल यांनी वणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तपासात पोलिसांना दोन संशयीत आरोपींबाबत काही क्ल्यू मिळाले. त्यांनी अमोल ठाकरे व सुधीर निखाडे या दोन आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली. चौकशीअंती पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात भादंविच्या 379 व 34 नुसार गुन्हा दाखल केला व दोघांना अटक केली. प्रकणाचा तपास स.पो.नि डोमाजी भादीकर करीत आहे.

हे देखील वाचा: 

JOB Alert – प्रयास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध पदांसाठी भरती

Comments are closed.