कोचिंग क्लासेस उघडण्यास सशर्त परवानगी
दहावी, बारावीची परीक्षा जाहीर झाल्याने शासनाचा निर्णय
जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनामुळे संपूर्ण जिल्ह्यात बंद करण्यात आलेले खाजगी कोचिंग क्लासेस सशर्त उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक तसेच विविध स्पर्धा परीक्षेची तारखा जाहीर झालेल्या आहेत. तथापि याच काळात कोचिंग क्लासेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे विविध कोचिंग क्लासेस संचालकांनी कळविले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी 19 मार्च रोजी कोचिंग कलासेस उघडण्याचे आदेश पारित केले आहे.
लॉकडाउन नियमानुसार कोचिंग क्लासेस, खाजगी शिकवणी वर्ग सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. कोचिंग क्लासेसमध्ये आसन क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 20 विद्यार्थी बसविता येईल. प्रत्येक दोन बॅच मध्ये अर्धा तासाचे अवकाश ठेवून कक्ष निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. कलासेसला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकांचे संमतीपत्र घेणे गरजेचे आहे.
क्लासेसमध्ये शिकविणारे शिक्षक व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. शिक्षक व विद्यार्थांनी मास्क घालणे तसेच सामाजिक दुरी ठेवावे लागेल. कोविड 19 चे अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.
खासगी कोचिंग कलासेस सस्थापकांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1997, फौजदारी प्रक्रिया संहिता 1873 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधित कायद्याच्या अनव्ये कार्यवाही करण्यात येईल. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हे देखील वाचा: