रमजान ईद निमित्त मनसेतर्फे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

जितेंद्र कोठारी, वणी : पवित्र रमजान महिन्याच्या अखेरीस शनिवार 22 एप्रिल रोजी वणी येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम धर्मियांचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे सण रमजान ईदचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा आणि सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

येथील शेतकरी मंदिर समोरील मस्जिद जवळ शनिवारी सकाळी 10 वाजता आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात मनसे नेता राजू उंबरकर यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम समाजाच्या प्रतिष्ठित नागरिकांचे राजू उंबरकर यांच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आले. पवित्र रमजान ईद सण हा बंधुभाव, एकता व सलोख्याचे संदेश देणारा असून परस्परांमधील सामंजस्य आणि आपुलकी वृद्धिंगत करण्याचा संकल्प करूया. असे आवाहन मनसे पक्षनेता राजू उंबरकर यांनी केले. यावेळी मुस्लिम बांधवांना लाडू वाटप करण्यात आले.

शुभेच्छा व सत्कार सोहळ्यात राजू उंबरकरसह उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार प्रदीप शिरस्कर, मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर अध्यक्ष शिवराज पेचे, इरशाद शेख, अज्जु शेख, इरफान सिद्दीकी, लकी सोमकुंवरसह मुस्लिम समाजाचे कदिर सेठ, हाजी आरिफ कादर, अन्सार चिनी, जब्बार चिनी, जावेद शेख, शाहिद खान, सरफराज खान, मुक्तेहार खान, नईम अजीज, हाजी जावेद, इमरान खान, मेहमूद खान, हबीब खान, सलीम खान, सहिद खान, राजा खान, मुस्ताक खान, जिया रब, मो. शकील उपस्थित होते. 

Comments are closed.