विजेच्या लपंडावाने झरी तालुक्यातील वीज ग्राहक त्रस्त
येदलापूर येथील सरपंचासह ग्रामवासी धडकले कार्यालयावर
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन, अडेगाव, कोसारा, गणेशपूर, झरी, पाटण, मांगली, भेंडाळा, हिरापूर, पिंपरड, राजूर(गो), बहिलमपूर व इतर गाव व परिसरात वीजेच्या लपंडावाची समस्या उद्भवल्याने ग्राहक त्रस्त झाले आहे. दिवस-रात्र वीज कधी गुल होईल याची शास्वती उरली नाहीत. पाच-दहा मिनीटांनी लाईट आली की पून्हा गुल होते. महावितरणाच्या गलथान कारभारामुळे गावा-गावांत रोष व्यक्त होत आहेत. याबाबत येदलापूर येथील सरपंचांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन निवेदन दिले आहे.
दररोजच्या विजेच्या त्रासामुळे येदलापूर गावावर याचा मोठा परिणाम होत आहे. सततचा त्रास बघता सरपंच सचिन डहाके हे ग्रावासीयांना घेऊन वीज वितरणाच्या कार्यालयावर धडक देऊन विविध मागण्याचे तक्रार दिली आहे. तक्रारीत गेल्या एक महिन्यापासून होणाऱ्या खंडित विदयुत पुरवठामुळे गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
येदलापूर गाव नदी काठावरील असल्यामुळे जलचर व अतिसंवेदनशील गाव असल्याने जोखीम यादीत नाव समावेश आहे. थोडाही पाऊस किंवा वर सुटला की लाईन बंद होते. खरबडा फादर सैद पुर्णपणे दुरुस्त करावि, पाटण सबस्टेशन वरील लाईनमन मुख्यालय राहण्याचे आदेध दयावे जेणे करून विद्युत पुरवठ्यात अडचण झसल्यास त्वरित दुरुस्त करता येईल तसेच गावातील विद्यत पुरवठा डीपी त्वरित बद्दलविण्यात यावी ,डीपीमुळे कोणतीही घटना दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी जवाबदार अभियंता व कनिष्ठ अभियंता राहील असा इशारा तक्रारीतून देण्यात असला आहे.
यावेळी सरपंच सचिन डहाके उपसरपंच विकास मानकर, नानाजी डहाके,विवेक मानकर,राजू डहाके,महेश दीडशे,अशोक ठाकरे,पुरुषोत्तम वैद्य,श्याम डहाके,अविनाश गोडे,रामदास मानकर,पांडुरंग गेडाम,अजय भोयर,अभिमन्यू ठाकरे व विकास गावंडे उपस्थित होते.
विजेच्या लपंडाव आता नियमित झाला आहेत. गेली-आली चा पाढा वीज ग्राहक दररोज वाचत आहेत. विजेचा लपंडावने परिसरती गांवे अंधारमय होत आहेत. वीज महावितरण ग्राहकांना तत्पर सेवा देण्यास फेल ठरत आहेत. आजच्या परिस्थितीत परिसरात विजेचा प्रश्न गंभीर झाला आहेत. परिणामी परिसरात वीज महाविरण प्रति रोष व्यक्त केला जात आहेत.
हे देखील वाचा:
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये रेफ्रिजरेटरवर चक्क मायक्रोव्हेव ओव्हन फ्री
पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर कारवाईला सुरुवात, 5 मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई
Comments are closed.