शनिवारी कोरोनाबाधिताचा मृत्यू, तर चार पॉजिटिव्ह
डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने पुन्हा काम सुरू
जब्बार चीनी, वणी: शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी देशमुखवाडीतील कोरोनाबाधित एक पुरुष (70) यांचा मृत्यू झाला. तर 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात. 19 नमुने स्वॅब टेस्टसाठी पाठवण्यात आलेत. सध्या तालुक्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 651 एवढी आहे. यवतमाळ येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने पुन्हा काम सुरू झाले आहे.
आज यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले 4 अहवाल प्राप्त झालेत. यातील चारही पॉजिटिव्ह आढळलेत. अद्याप 19 अहवाल येणे बाकी आहे. आज 8 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी मिळाली. सध्या तालुक्यात एकूण 651 पॉजिटिव्ह रुग्ण आहेत. यातील 581 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत.
सध्या तालुक्यात 51 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 2 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 49 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 15 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 5 व्यक्ती भरती आहेत.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)