सावधान… वणी तालुक्यात कोरोना पुन्हा काढतोय डोके वर

आज तालक्यात कोरोनाचे 5 रुग्ण, शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव

जब्बार चीनी, वणी: कोरोनाची दुसरी लाट ओसरून तीन चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर आता कोरोनाच्या तिस-या लाटेला सुरूवात झाली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून तालुक्यात रुग्ण आढळायला सुरूवात झाली असून आज दिनांक 10 जानेवारी रोजी तालक्यात तब्बल 5 रुग्ण आढळले आहेत. यात गुरूनगर येथील एक पुरुष, मनिष नगर येथील एक महिला, भीमनगर येथील एक पुरुष तर ग्रामीण भागात तेजपूर येथील एक महिला तर मोहुर्ली येथील एक महिला पॉझिटिव्ह आढळली आहे.

वणी तालुक्यात ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोरोनाची तिसरी लाट व नवीन व्हेरिएन्ट ओमिक्रॉनच्या भीतीने राज्यात लॉकडाऊन लागले आहे. हे लॉकडाऊन संपूर्ण नसले तरी सर्वसामान्य नागरिकांवर अनेक निर्बंध सरकारने लावले आहे. सोबतच नागरिकांना गर्दी न करण्याचे तसेच मास्क वापरण्याचे आवाहन देखील प्रशासन करीत आहे.

अफवांकडे दुर्लक्ष करून लस अवश्य घ्या !
कोरोनाच्या लसीमुळे मृत्यूदरात प्रचंड घट आल्याने नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. कुणाला गावात लसीकरण शिबिर घ्यायचे असल्यास त्यांना देखील महसूल व आरोग्य विभागात संपर्क साधून सामुहिक लसीकरण करता येऊ शकते. शहरात ग्रामीण रुग्णालय व कल्याण मंडपम येथे लसीकरण सुरू आहे. तसेच 15 वर्षांवरील कुमारवयीन मुलांसाठीही लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे त्यांनी देखील आवर्जून लस घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच लसीबाबत अफवा न पसरवण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. 

हे देखील वाचा:

संपत आली जवानी, तरी सासरा म्हणतोय माझी अधुरी कहाणी

मुकुटबन ग्रा.प.उपसरपंचासह दहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Comments are closed.