जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 19 मे रोजी तालुक्यात 54 पॉझिटिव्ह आढळलेत. यात शहरातील 11 तर ग्रामीण भागातील 42 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात मंदर येथे सर्वाधिक 14 तर वांजरी येथे 7 रुग्ण आढळलेत. याशिवाय आज 48 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आज आलेला रुग्णसंख्येचा दर कालपेक्षाही 2 टक्यांनी कमी झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून रुग्णसंख्येचा दर सातत्याने कमी होताना दिसत आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोना कमी होण्याकडे वाटचाल सुरू झालेली दिसत आहे.
वणीत आलेल्या 11 रुग्णांमध्ये जैन ले आऊट, कनकवाडी, हिराणी ले आऊट येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर विद्यानगरी, जुना कॉटन मार्केट, रामपुरा, गुरुनगर, विठ्ठलवाडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
ग्रामीण भागात आलेल्या 42 रुग्णांमध्ये मंदर येथे सर्वाधिक 14 रुग्ण आढळलेत. तर वांजरी येथे 7 रुग्ण आढळलेत. याशिवाय चिखलगाव येथे 3, गणेशपूर, परसोडा, सावर्ला येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळलेत. तर पिंपळगाव, नवरगाव, रासा, नायगाव, घोन्सा, परमडोह, राजूर (इजारा), मेंढोली, तेजापूर, येनाडी, ढुनकी, पुरड येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. बोपापूर येथील 1 रुग्ण वणी येथे पॉझिटिव्ह आला आहे.
आज यवतमाळ येथून 616 अहवाल प्राप्त झालेत. यात 51 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 232 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 3 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णावरून 285 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 887 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात कोरोनाचे 580 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 56 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 459 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 65 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5011 रुग्ण आढळून आलेत. यातील 4351 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 80 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
आज रुग्णसंख्येचा दर हा अवघा 6.3 टक्के
काल एकूण 948 पैकी 80 व्यक्ती पॉझिटिव्ह आले होते. रुग्णसंख्येचा हा दर 8.3 टक्के होता. आज आरटीपीसीआर व रॅपिड ऍन्टीजन असे 848 पैकी 54 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. रुग्णसंख्येचा हा दर 6.3 टक्के आहे. रुग्णसंख्येचा हा दर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. एका आठवड्याआधी हा दर 25 ते 30 टक्यांपर्यंत पोहोचला होता.
हे देखील वाचा: