अखेर मार्डी येथे 10 बेडचे विलगीकरण कक्ष स्थापन

अरुणा खंडाळकर यांच्या प्रयत्नांना यश

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मार्डी परिसरातील कोरोना रुग्णाला वेळेवर उपचार मिळण्यासाठी जि. प. सदस्या अरुणा खंडाळकर यांच्या प्रयत्नातुन मार्डी येथे गुरू कृपा मंगल कार्यालयातविलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत या कक्षाचे लोकार्पण करण्यात आले.

मार्डी येथील सामाजिक कार्यकर्ते अभय जुमळे यांनी सर्व सोयीनिशी उपलब्ध असलेले त्यांचे गुरुक्रुपा मंगलकार्यालय विलगीकरणासाठी सेवार्थ देण्याचे जाहीर केले. त्यामुळे विलिगिकरणाबाबतचा मार्ग मोकळा झाला. मार्डी-कुंभा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या अरुणा खंडाळकर यांच्या पुढाकारात येथील विलगीकरण कक्षात 10 बेडची व्यवस्था करण्यात आली असुन येथे रुग्णांसाठी दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

तालुक्यात कोरोणा या आजाराची साथ झपाट्याने वाढत आहे. यामध्ये मार्डी-कुंभा या जिल्हा परिषदेच्या मतदार गटाने उच्चांक गाठला आहे. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी मार्डीत ग्रुहविलगीकरणा शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी अरुणा खंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रतिनिधीची बैठक पार पडली. कोरोना साथीची चेन तोडण्यासाठी मार्डीत विलगीकरणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने येथे कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या लोकार्पण सोहळ्याला मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोहर नाल्हे, सरपंच रविराज चंदणखेडे, उपसरपंच प्रफुल्ल झाडे, गुरुक्रुपा मंगल कार्यालयाचे प्रुमुख अभय जुमळे, ग्रामपंचायत सदस्य माणिक कांबळे, राजकुमार बोबडे, माजी सरपंच सुरेश चांगले, तालुका वैधकिय अधिकारी डॉ. अर्चना देठे, डॉ, तेजस आस्वले प्रामुख्याने उपस्थित होते.

हे देखील वाचा:

दिलासा: कोरोना रुग्णसंख्येचा दर आला अवघ्या 8 टक्यांवर

मारेगाव तालुक्याला आज दिलासा…!

Leave A Reply

Your email address will not be published.