मारेगावात आज 13 पॉझिटिव्ह, तर एकाचा मृत्यू

52 व्यक्तींनी केली कोरोनावर मात

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 19 में रोजी तालुक्यात केवळ 13 पॉझिटिव्ह आढळले. तर 52 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान तालुक्यात आज पाथरी येथील 80 वर्षीय एका कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज आरोग्य विभागाने 249 व्यक्तींची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात केवळ 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तसेच आज 118 व्यक्तींचे आरटीपीसीआर टेस्ट केली, त्यांचे नमुने यवतमाळ येथे तपासणी करिता पाठवण्यात आले आहे. तसेच आज आरटिपीसीआर 382 रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात 9 असे एकूण तालुक्यातील 13 पॉझिटिव्ह आढळले आहे.

709 व्यक्तींचा आरटिपीसीआर रिपोर्ट पेंडिंग आहे.तसेच आज 52 व्यक्तींनी कोरोनावर मात करत बरे होऊन घरी परतले आहे. तालुक्यात सध्या 222 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंट वर 23 रुग्ण उपचार घेत आहेत. तर उर्वरित होम आयसोलेट आहेत. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तालुक्यात एकीकडे रुग्णांची संख्या कमी होत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तालुक्याला दिलासा मिळत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

आज तालुक्यात 54 पॉझिटिव्ह, मंदर येथे 14 रुग्ण

हेदेखील वाचा

अखेर मार्डी येथे 10 बेडचे विलगीकरण कक्ष स्थापन

हेदेखील वाचा

झरी, मुकुटबन व शिबला येथे जिल्हाधिकारी यांची भेट

Leave A Reply

Your email address will not be published.