जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील वामणघाट रोड व जटाशंकर चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर चिखलगाव येथे 2 रुग्ण तर कोना व घोन्सा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 51 झाले आहेत. लॉकडाऊन दरम्यान शास्त्रीनगर चौक येथे संध्याकाळी 5 नंतर दारूची अवैधरित्या विक्री सुरू आहे. याबाबत व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई न झाल्याने परिसरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
शनिवारी दिनांक 20 मार्च रोजी 131 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 6 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 124 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 82 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. आज यवतमाळ हून एकही रिपोर्ट प्राप्त झाला नाही. अद्याप यवतमाळहून 793 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात 51 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. कालपेक्षा ही संख्या 3 ने कमी आहे. 51 रुग्णांपैकी 19 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 23 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. 9 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1337 रुग्ण आढळून आलेत. यातील 1260 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
शात्रीनगर येथे खुलेआम दारूविक्री
शास्त्रीनगर येथे संध्याकाळी 5 नंतर खुलेआम दारूविक्री होत आहे. याबाबत स्थानिकांनी एक व्हि़डीओ क्लिपही व्हायरल केली आहे. मात्र अद्याप पोलीस प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई न केल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहे. राजरोसपणे परिसरात दारूविक्री सुरु असल्याने परिसरातील वातावरण खराब होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दरम्यान व्हिडीओ व्हायरल होऊन तसेच व्हिडीओत एक महिला दारू विक्री करीत असताना स्पष्ट दिसत असतानाही पोलीस प्रशासन कारवाई करण्यास का धजावत आहे हे एक न उलगडलेले कोडे आहे.
हे देखील वाचा: