केळापूर जगदंबा संस्थानचे अध्यक्ष वामनराव सिडाम यांनी कोरोनाला हरवले
वयाच्या 76व्या वर्षी केली कोरोनावर मात
बहुगुणी डेस्क, यवतमाळ: आदिवासी जनसेवक तथा श्री जगदंबा संस्थान केळापूरचे अध्यक्ष वामनराव सिडाम यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथील अधीक्षक डॉ संजय तोडासे त्यांच्याकडे तपासणी केली. तेव्हा सिडाम यांच्यात कोरोना पॉझिटिव्हची लक्षणे दिसली. त्यांना एचआरसिटी करण्याचा सल्ला दिला. एचआरसीटी रिपोर्ट 11 आला.
त्यामुळे कोवि केअर हॉस्पिटल यवतमाळ येथे इमर्जन्सी वार्डमध्ये त्यांना भरती करण्यात आले. दमा, डायबिटीज, श्वास घेण्यासाठी जास्त त्रास होत असल्याने येथील डॉ प्रमोद लोणारे ,डॉ सुमेध गुडदे, डॉ स्वप्नील मानकर, डॉ सुबोध तिखे, डॉ मुजमिल कोशिश यांच्या 15 दिवसांच्या शर्थीचे प्रयत्न उपचार करून त्यांना या आजारातून सुखरूप बाहेर काढले.
प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मिळविलेला विजय वामनराव सिडाम यांच्यासाठी एक प्रकारे पुनर्जन्माचा अनुभव होता. वामनराव सिडाम यांच्यासाठी 15 दिवसांचा काळ खूप भयानक व परीक्षा घेणारा होता. सकारात्मक व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनाविरुद्ध जीवघेणी लढाई जिंकली.
कोरोना हा खरोखरच गंभीर आजार आहे. त्यामुळे कुणीही याला हलक्याने घेऊ नये असे सांगताना त्यांनी संक्रमितांना भीती न बाळगण्याचा व सदैव पॉझिटिव्ह राहण्याचा संदेश दिला. रुग्णालयातील सफाई कर्मचारी प्रमोद ब्राह्मणे, प्रमोद उसरे यांनी सेवा केली त्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा