निष्क्रिय दक्षता समिती अॅक्टिव्ह करणे गरजेचे आहे
अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानावर व गर्दीवर नियंत्रण नाही
सुशील ओझा, झरी : कोरोनाची दुसरी लाट पहली लाटेपेक्षा भयावह आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाच्या भीतीने भयावह स्थिती झाली आहे. तालुक्यात रोज नवनवीन गावात कोरोनाचा प्रवेश होऊन रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. असे असताना मात्र सध्या तालुक्यातील काही अपवाद वगळता सर्व ग्राम दक्षता समित्या निष्क्रिय झाल्या आहेत.
कोरोनाला गावपातळीवर नियंत्रणात ठेवण्याच्या उपाययोजनेच्या दृष्टीने ग्राम दक्षता समितींची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या समित्या बहुतांश गावांत निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावागावांतील कोरोना संदर्भातील उपाययोजना योग्य प्रमाणात राबविल्या जात नाही. भविष्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन पुन्हा एकदा या समित्या अॅक्टिव्ह करणे गरजेचे वाटू लागले आहे.
ग्रामीण भागात कोरोना संक्रमण थांबविण्याच्या दृष्टीने गावपातळीवर ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. सरपंच समितीचे अध्यक्ष आणि पोलीस पाटील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी व गावातील काही जणांची समितीत नियुक्ती करण्यात आली. पहील्या टप्प्यातील कोरोना काळात या समित्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करून चांगली कामगिरी केली.
त्याची दखल घेत समित्यांना शासनाच्या सूचनेप्रमाणे दंडीत करण्याचे अधिकार दिले. त्यातून अनेक जणांवर कारवाईसुध्दा करण्यात आली. त्यामुळे समितीचा चांगला जोम गावोगावी बसला होता. मध्यंतरी काळात कोरोना प्रादुर्भाव कमी झाला. त्यातच मध्यंतरी काळात तालुक्यातील गावात निवडणुकीचे वातावरण होते. सत्ता बदल झाल्याने गाव कारभारी बदलले.
दररोज झपाट्याने कोरोना बाधिताची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शासनाने नवीन नियमावली लागू केली. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र ग्राम दक्षता समिती निष्क्रिय झाल्याचे चित्र आहे. ही गावातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवावीत विलीगिकरणातील रुग्णांना बाहेर फिरू न देणे गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे, कंटेन्मेंट झोन निर्माण करणे या प्रकारच्या व इतरही जबाबदरी समितीवर आहे.
या जबबदरीचा विसर समितीला पडलेला दिसतो आहे गावात परराज्यातून, परदेशातून येणाऱ्यांवर, अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांवर गर्दीवर दक्षता समितीचे नियंत्रण राहिले नाही.
तालुक्यातील काही मोठ्या गावामध्ये आरोग्य अधिकाऱ्याने पत्र देऊनही ग्राम दक्षता समिती निष्क्रियच आहे तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार आटोक्यात ठेवून विविध उपाययोजना राबविण्याची जबाबदारी ग्राम दक्षता समितीवर सोपविण्यात आली आहे. मात्र, या निष्क्रिय दक्षता समित्या तातडीने अॅक्टिव्ह करणे गरजेचे आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा