नरसाळा येथे दोन अवैध दारूविक्रेत्यांवर धाड

दारूबंदीसाठी महिलांनी कसली कंबर

2

नागेश रायपुरे, मारेगाव: नरसाळा येथील महिलांनी आपली कंबर कसून दारू विरोधात एल्गार पुकारला आहे. येथे पुन्हा दोन अवैध दारूविक्री करणाऱ्या युवकांची पोलिसांना माहिती देऊन त्यांना मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. भारत उर्फ लोकेश रामटेके (26), रुपेश रामटेके (23) रा.नरसाळा असे पोलिसांनी धाड टाकून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Podar School 2025

महिन्याभरापूर्वीच नरसाळा येथील महिला मंडळांनी गावात अवैध देशी दारूविक्री करणाऱ्यांना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. अशातच दोन अवैध दारूविक्रेता गावात चोरट्या पद्धतीने दारू विकत असल्याची माहिती महिला मंडळांना मिळताच दरम्यान मारेगाव पोलिसांना पाचारण करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी मारेगाव पोलिसांनी महिला मंडळाच्या समक्ष आरोपींकडून 24 देशी दारूचे पव्वे किंमत 1350/- व वापरण्यात आलेली मोटरसायकल (MH 29 BK 4312) किंमत 35000/- असा एकूण 36350/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 10 नोव्हेंबर च्या सकाळी 10.30 वाजता करण्यात आली.

आरोपी लोकेश रामटेके, रुपेश रामटेके यांच्यावर अपराध कलम 289/20 नुसार 65 अ, ई.गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.ही कारवाई उप.वि.पो.अधिकारी पुज्जलवार, पो.नि.जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पो. उप. नि. अमोल चौधरी, जमादार आनंद अचलेवार, महेश राठोड, रजनीकांत पाटील यांनी केली.

हेदेखील वाचा

 

 

 

 

 

 

2 Comments
  1. […] नरसाळा येथे दोन अवैध दारूविक्रेत्यां… […]

  2. […] नरसाळा येथे दोन अवैध दारूविक्रेत्यां… […]

Leave A Reply

Your email address will not be published.