“बडी महंगी हुई शराब, के थोडी थोडी….. “

तिन्ही तालुक्यांत दारूची चढ्या भावाने विक्री

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यात 6 देशी दारू दुकान व 11 बियर बार आहेत. तर वणी व मारेगाव तालुक्यातही शेकडो बियरबार असून तीनही तालुक्यातील बियरबार व देशी दारू दुकानचालक एम आर पी किमतीपेक्षा जास्त दराने दारू व बियर विकून जनतेची लूट करीत आहेत. वणी, मारेगाव व झरी या तीन तालुक्यंत दारू दुकान असोशियनने या किंमत वाढवल्याची माहिती असून याकडे अबकारी विभाग झोपेचे सोंग घेऊन आहे.

 

देशी दारू दुकानात पव्वाची किंमत ५२ रू. असून बहुतांश दुकानांतून 55 ते 60 रुपये दराने विक्री करीत आहे. बियरबार व वाइन शॉपी मध्ये विदेशी दारू व बियर वर 20 ते 25 जास्त घेऊन जनतेची खुलेआम लूट करीत आहे. वणी विधानसभेतील तीन तालुके वगळता संपूर्ण जिल्ह्यात 20 ते 25 रुपये विदेशी दारूची किंमत कमी आहे. मग वणी विधानसभेतील वणी, मारेगाव व झरी या तीन तालुक्यातील दुकानदारांना किंमत वाढवण्याची काय गरज या बेभाव दारू विक्रीवर लगाम कोण लावणार असा संतप्त प्रश्न जनता करीत आहे.

 

बहुतांश बियरबारमध्ये शौचालय नाही. पार्किंग व इतर सुविधेचा अभाव आहे. अनेक मद्यपी कुणाच्याही घराचा, कुपटाचा, झाडाचा आडोसा घेऊन लघवी करताना पाहायला मिळत आहे. सदर दारूविक्रेते जनतेला लुटत असल्याचे अबकारी विभागाला माहीत असून त्यांना कार्यवाही का करत त नाही असा सवाल जनतेस पडला आहे. का ते नियम तोडून दारू विक्री करीत आहे?  तसेच देशी दारू चिल्लर विक्रीचे दुकान असून ठोक विक्री करीत आहे? आपल्या मर्जीने दारूचे रेट वाढउन  विक्री करीत आहे हा सर्व प्रकार नियमात बसत नसतानाही  या दारू विक्रेत्यांवर का कार्यवाही होत नाही हे एक कोडेच आहे . या दारू विक्रेत्यांना अबकारी विभाग व पोलीस विभागाचे सहकार्य असल्याने जास्त दराने दारू विक्री व नियम मोडण्याचा प्रकार सूरु असल्याचे दिसत आहे. तरी अबकारी विभागाने विभागाने जातीने लक्ष देऊन जास्त दराने दारू विकीतून जनतेची  होणारी लूट थांबवावी अशी जनतेकडून मागणी होत आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.