मारेगाव तालुक्यात वीज कोसळून मालकासह बैलाचा मृत्यू

रविवारी दुपारी परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील वागदरा जवळ गजरा पोड येथे रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान वीज कोसळून एक व्यक्तीसह बैलाचा मृत्यू झाला आहे. गजरा पोड वागदरा येथील शेतकरी गणेश बोतु आत्राम हा वागदरा शेतशिवारात बैल चारत असताना अचानक विजेचा कडकडात झाला, त्यात त्याच्या सह त्याच्या बैलाचा मृत्यू झाला.

गणेश आत्राम हे सकाळी त्यांच्या बैलजोडीसह शेतात गेले होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास वीजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात त्यांचा आणि त्यांच्या बैलजोडीतील एका बैलाचा मृत्यू झाला.  संध्याकाळी  सात वाजताच्या सुमारास एकच बैल घरी परत आला. त्यामुळे गावकऱ्यांनी शेतात जाऊन काय झालं याची पाहणी केली. तर सदर घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव भाजपा तालुका अध्यक्ष शंकर लालसरे यांनी  घटना स्थळी भेट देऊन सबंधित अधिकाऱ्यांना याची माहित माहिती दिली व नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. गणेश आत्राम यांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.