राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सुकनेगाव, पळसोनीतील शिक्षिकेने पटकावले पारितोषिक

विजेत्या शिक्षिकेचे सर्वत्र कौतुक

0

रवि ढुमणे, वणी: नुकत्याच झालेल्या राजस्तरीय निबंध स्पर्धेत सुकनेगाव व पळसोनी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने जिल्ह्यातून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

जीवन गौरव राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत वणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सुकनेगाव येथील वसुधा ढाकणे व जिल्हा परिषद शाळा पळसोनी येथील हर्षदा चोपणे या दोनही महिला शिक्षकांनी जिल्ह्यातून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे  पारितोषिक पटकावले आहे.  जीवन गौरव राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम व द्वितीय स्थान मिळवीत तालुक्यात मानाचा तुरा रोवला आहे.

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर होताच पळसोनी जिल्हा परिषद शाळेत हर्षदा चोपणे यांचा शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करून सत्कार केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.