लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीची फसवणूक, प्रेयसीने प्राशन केले विष

जितेंद्र कोठारी, वणी: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक केल्या प्रकरणी प्रेयसीने प्रियकराविरोधात वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे प्रियकरासोबत लग्नावरून वाद झाल्याने प्रेयसीने विष प्राशन केले होते. पण उपचारानंतर प्रेयसीची प्रकृती ठिक झाली. प्रियकर गेल्या 10 वर्षांपासून फसवणूक करत असल्याने प्रेयसीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. वणी तालुक्यात ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी प्रियकराविरोधात विविध कलनान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

सविस्तर वृत्त असे की पीडिता ही 26 वर्षीय तरुणी आहे. ती तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती तिच्या कुटुंबासह राहते व वणीत खासगी नोकरी करते. तिची 10 वर्षांआधी वाघदरा (नवीन) येथील रहिवासी असलेल्या धीरज नानाजी उके (28) या तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. पुढे मैत्री प्रेमात बदलली. त्यांच्या भेटी गाठी सुरू झाल्या. दरम्यान धीरज याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध जोडले. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असताना प्रेयसीला लग्नासाठी एक स्थळ आले व तिचे लग्न ही पक्के झाले. मात्र दरम्यानच्या काळात प्रियकर प्रेयसीतील शारीरिक संबंध कायम होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पुढे दोन तीन महिन्यांनी पीडित प्रेयसीचे लग्न झाले. मात्र लवकरच ती दुस-याच दिवशी माहेरी परत आली व तिथेच राहू लागली. काही महिन्यातच तिची सोडचिठ्ठी झाली. मात्र या काळात तिचे प्रियकरा सोबत संबंध सुरूच होते. सोडचिठ्ठी झाल्याने ती प्रियकराजवळ लग्नासाठी विचारणा करायची. मात्र काही ना काही कारण सांगून प्रियकर लग्नाचा विषय टाळायचा. त्यावरून त्या दोघांमध्ये सारखे वाद व्हायचे. दिवसेंदिवस हा वाद विकोपाला जात होता.

प्रेयसीने प्रशान केले उंदिर मारण्याचे औषध
गेल्या आठवड्यात दुपारी मोबाईलवर कॉल करून प्रियकराने पीडितेला वणीलगत नांदेपेरा रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळ बोलवले. मात्र यावेळी प्रेयसी सोबत विषारी द्रव्य घेऊन गेली. तिथे तिने प्रियकरासोबत लग्नाबात विचारणा केली. मात्र लग्न करण्यास प्रियकराने नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. दरम्यान प्रेयसीने रागाच्या भरात विषारी द्रव्य प्राशन केले.

प्रेयसीने विषारी द्रव्य प्राशन केल्याने प्रियकराने प्रेयसीला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला चंद्रपूर येथे रेफर केले. तिथे प्रेयसीवर उपचार झाला. प्रकृती धोक्याबाहेर आल्यानंतर तिला चंद्रपूरहून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर तिला वणीतील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तीन दिवसांआधी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

मात्र प्रियकर लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्षांपासून फसवणूक करीत असल्याचे लक्षात येताच प्रेयसीने वणी पोलीस स्टेशन गाठले व याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी प्रियकर धीरज नानाजी उके (28) रा. नवीन वागदरा याच्या विरोधात भादंविच्या कलम 376 (2) (N) व 417 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

Comments are closed.