नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) येथील तसेच श्री जगन्नाथ महाराज महाविद्यालय वणी येथील कार्यरत असलेले प्रा. दीपक अवथरे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अर्थशास्त्र या विषयात आचार्य (PHD) पदवी बहाल केली.
प्राचार्य डॉ. पुष्पा तामडे यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्ड योजनेचे आर्थिक अध्ययन (कालखंड 1999-2000 ते 2011-2012) या विषयावर अमरावती विद्यापीठात त्यांचे संशोधन आहे. कठीण परिश्रम करून त्यांनी हे यश संपादन केले आहे.
आपल्या यशाचे श्रेय प्रा. डॉ. दीपक अवथरे हे आपले आई, वडील, पत्नी दुर्गा, मुलगा नेहांत तसेच प्रा. डॉ. करमसिंग राजपूत, प्रा.डॉ. राजेंद्र माडवलकर, प्रा.डॉ. संतोष कुटे, प्रा. डॉ. माणिक ठिकरे, प्रा. डॉ. पुष्पा तावडे, प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांना देत आहे.
संस्थेचे सचिव संजय देरकर, संचालिका सौ. किरण देरकर यांनी कौतुक केले आहे. तसेच परिसरातसुद्धा त्यांना मिळालेल्या यशाबद्धल कौतुक केले जात आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हादेखील वाचा