राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

सावंगी येथील  कार्यक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

तालुका प्रतिनिधी, वणी:  तालुक्यातील सावंगी (लहान) येथे दि.12 मंगळवारी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवजन्मोत्सव युवा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिजाऊ वंदना गायन करण्यात आली.

मिलिंद ढवस, महेंद्र ढवस, हेमंत ढवस, प्रशांत बोबडे, विकास ढवस आदींनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्याविषयी विचार व्यक्त केले. युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला विठ्ठल पाचभाई, आशिष ढवस, अमर मुके, प्रकाश देरकर, संदीप ढाक, विलास बोबडे, फाल्गुन ठाकरे, सोयम ढवस, प्रफुल ठाकरे, हर्षल देरकर, अनुप ढवस, गौरव गानफाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेदेखील वाचा

सिंदी येथे विष प्राशन करुन आत्महत्या

हेदेखील वाचा

साई लॅपटॉप व कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मकरसंक्रांती ऑफर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...