अन्यथा…. मनसैनिक बनणार ‘ट्रॅफिक’ पोलीस
शाळा व कॉलेजच्या मार्गावर वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे वाहतूक उप शाखा कार्यरत असताना शहरात वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. जर वाहतूक पोलीस आपले कर्तव्य पार पाडण्यास हयगय करीत असेल तर मनसे कार्यकर्ते ट्रॅफिक पोलिसांचा गणवेश परिधान करुन चौका चौकात उभे राहणार. असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी वाहतूक शाखा प्रमुखांना दिला आहे.
वणी नांदेपेरा रस्त्यावर अनेक शाळा व महाविद्यालय असून या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. याशिवाय या मार्गावर चिडीमार करणारे तरुण तसेच धूम स्टाईल बाईकर्स व स्कुटर रेसिंग करीत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक चिमुकल्याना अपघातात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
याशिवाय साई मंदिर चौकात प्रवासी ऑटोचालक रस्त्याच्या मध्ये आपले ऑटो उभे करुन वाहतुकीस अडथळा उत्पन्न करीत आहे. शहरातील साई मंदिर चौक, बायपास चोफुली व वडगाव रोड फाट्यावर शाळा उघडण्या व सुटण्याच्या वेळेवर वाहतूक कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात यावी. अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आली आहे.
जर मागणी मान्य केली नाही तर मनसैनिक स्वत: ट्रॅफिक पोलीस बनूण ट्रॅफिक पोलिसांचे कर्तव्य पार पाडेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी धनंजय त्रिंबके, आजिद शेख, लकी सोमकुंवर, अक्षय हेपट, संकेत पारखी, अनिकेत येसेकर इत्यादी मनसैनिक उपस्थित होते.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
मुख्यमंत्री होण्यापूर्वी “ते” वणी, माजरीला विकायचे किरकोळ सामान….