सुप्रसिद्ध डॉ. हर्षद कोमरेड्डीवार यांची वणीत आरोग्यसेवा

14 जानेवारीपासून देणार श्री विघ्नहर्ता क्लिनिकमध्ये सेवा

0

विवेक पिदूरकर: नागपूर येथील सुप्रसिद्ध फॅमिली फिजिशियन व जनरल प्रॅक्टिशनर डॉ. हर्षद चं. कोमरेड्डीवार (MD (Medicine ayu) CVD, CSD (त्वचारोग) Mumbai) हे गुरुवारी दिनांक 14 जानेवारी 2021 पासून वणीतील सर्वोदय चौक येथील श्री विघ्नहर्ता क्लिनिक व इमरजन्सी केअर सेंटर येथे आरोग्य सेवा देणार आहे. डॉ. कोमरेड्डीवार यांनी नागपूर येथे किंग्जवे हॉस्पिटल, मिडास हॉस्पिटल व मुंबई येथील पोद्दार हॉस्पिटल येथे याआधी आरोग्य सेवा दिली आहे.

श्री विघ्नहर्ता क्लिनिक व इमरजन्सी केअर सेंटर हे सर्वोदय चौक, जत्रा रोड वणी येथे आहे. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे तापाचे निदान व उपचार, संधीवात, लकवा व इतर वातरोग, काविळ, पोटाच्या आजाराचे निदान व उपचार, शुगर, बीपी, दमा, थॉयराईड, त्वचारोग इत्यादी विषयक निदान व उपचार केला जातो. याशिवाय स्वास्थ विषयक सल्ला व सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा 24 तास उपलब्ध आहे.

हॉस्पिटलमध्ये ‘या’ उपलब्ध सुविधा
श्री विघ्नहर्ता क्लिनिक व इमरजन्सी केअर सेंटर येथे ओपीडी, सुसज्ज आंतररुग्ण विभाग, ईसीजी मशिन, ऑक्सिजन सुविधा, मल्टीपॅरा मॉनिटर, नेब्युलायझर इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय बीपी शुगर व इतर रक्त तपासणी याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

पत्ता: श्री मेडिकल ऍन्ड श्री कॉम्प्लेक्स
सर्वोदय चौक, जत्रा रोड वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: 8805546299 8805940441

हेदेखील वाचा

साई लॅपटॉप व कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मकरसंक्रांती ऑफर

हेदेखील वाचा

अन्यथा…. मनसैनिक बनणार ‘ट्रॅफिक’ पोलीस

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...