येनक येथील रस्ता बांधकामाच्या चौकशीची मागणी

बांधकाम निकृष्ट झाल्याचा मनसेचा आरोप

तालुका प्रतिनिधी, वणी: येनक येथे तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, सदर बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप आहे. म्हणून सदर रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिंदोला-लाठी गणाचे विभागीय अध्यक्ष रणजित बोंडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना केली आहे.

वणी तालुक्यातील येनक येथे तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत सहा महिन्यांपूर्वी गावातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. तथापि, संबधित कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. सदर बांधकामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दोन वेळा केली होती.

मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेत चौकशी केली नाही. म्हणून त्रस्त ग्रामस्थांनी पुन्हा निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे. यावेळी चौकशी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनाच्या प्रति संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हे देखील वाचा:

वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम व सर्वात मोठी पाणीटंचाई

भरदिवसा वणीत रंगला थरार, हल्लेखोरांचा चाकू घेऊन पाठलाग

दोन दुचाकीची समोरासमोर धडक, एक ठार तर दोन जखमी

 

Comments are closed.