डॉ. संतोष डाखरे यांचे ‘लक्षवेध’ पुस्तक प्रकाशित

आमटे दांपत्याच्या हस्ते होणार विमोचन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांगरुड या गावाचे सुपुत्र व सध्या भामरागड येथील कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले डॉ. संतोष डाखरे यांच्या ‘लक्षवेध’ या पुस्तकाचे येत्या 10 ऑक्टोबर रोजी विमोचन होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील रेमन मॅगसेसे व मानाचा पद्मश्री पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध समाजसेवी दांपत्य डॉ. प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते या पुस्तकाचे ऑनलाईन पद्धतीने विमोचन पार पडणार आहेत. कोरोना काळातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा या पुस्तकात वेध घेण्यात आला आहे.

राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेच्या विदर्भ प्रांत अध्यक्षा डॉ.अलका देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पवार, डॉ. कमल सैनी (राजस्थान), डॉ. विवेककुमार हिंद (बिहार), डॉ. संपदा कुल्लरवार, डॉ. हेमराज लाड उपस्थित राहणार आहेत. या पुस्तकाचे समीक्षण सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक डॉ. संदीप तुंडूरवार करणार आहेत. आभासी पद्धतीने होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक डॉ.मंगेश आचार्य यांनी केले आहे.

डॉ. संतोष डाखरे हे मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथील रहिवासी असून सद्या ते राजे विश्वेश्वरराव कला- वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहे. काही काळ त्यांनी वणी शहरात पत्रकारिता देखील केली आहे. एक स्तंभलेखक व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींसह सामाजिक आणि आर्थिक विषयावर ते विविध वृत्तपत्रातून स्तंभलेखन करीत असतात. ‘वणी बहुगुणी’ पोर्टलवर देखील त्यांचे विविध विषयांवरील विश्लेषण प्रकाशित झाले आहे.

हे देखील वाचा:

थरार….! वाघीण आणि शेतकरी विरकुंडच्या जंगलात आमनेसामने

ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष… संजय देरकर…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.