मारेगाव तालुक्यात सरपंच उपसरपंचपदाची निवड 18 व 22 फेब्रुवारीला
कोण होणार सरपंच? उत्सुकता शिगेला
नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील 31 ग्राम पंचायतीसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले होते. 18 व 22 फेब्रुवारी रोजी मारेगाव तालुक्यातील सरपंच-उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. जाहीर झालेल्या आरक्षणानात 56 ग्रामपंचायत पैकी 25 ग्रामपंचायत पेसा अंतर्गत राखीव आहेत. उर्वरित 31 पैकी 29 ग्राम पंचायतीवर महिला सरपंचाचे आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांचे सरपंच होण्याचे स्वप्न भंग झाले आहे.
18 फेब्रुवारी रोजी केंगाव (बोदाड), चिंचमंडळ, खैरगाव (बु), गाडेगाव, चोपण, मजरा, किन्हाळा, पहापळ, देवाळा, बोरी(बु), पिसगाव, चिंचाळा, सावंगी, नरसाळा, सिंधी (महागाव) या 15 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया होणार आहे. तर 22 फेब्रुवारी रोजी कोथुर्ला, शिवणाळा, घोगुलदरा, चि. बोटोणी, आकापूर, आपटी, दांडगाव, हिवरा-मजरा, कुंभा, करणवाडी, टाकळी, इंदिराग्राम, मांगरूळ, कोलगाव, टाकळखेडा या 16 ग्राम पंचायतीच्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवड प्रक्रिया होणार आहे.
मारेगाव तालुक्यातील 31 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया 15 जानेवारी रोजी पार पडली. निवडणूकीचा निकाल 18 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. यात तहसील कार्यालयाच्या भवनात सरपंच पदाचे आरक्षण 2 फेब्रुवारी रोजी ईश्वर चिठीने काढण्यात आले. तर ग्रामपंचायतीच्या महिला व सर्वसाधारण सरपंच पदाचे आरक्षण 4 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आले होते.
असे राहणार आरक्षण:
खुला प्रवर्ग महिला राखीव – केगाव, खैरगाव (बु.), मजरा, सिंदी, हिवरा-मजरा, टाकळी, वेगाव, कानडा, वनोजा देवी
सर्वसाधारण खुला – किन्हाळा, बोरी, आपटी, करणवाडी, मांगरुळ, कुंभा, मार्डी,
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला – गाडेगाव, चोपन, इंदिरा ग्राम, कोसारा, हिवरी, गौराळा
सर्वसाधारण ओबीसी – सावंगी को (ना.म.प्र. सर्वसाधारण), इंदिरा ग्राम. शिवणी धोबे,
कोलगाव अनुसुचित जाती महिला, टाकरखेडा अनुसुचित जाती सर्वसाधारण
अनुसुचित जमाती (महिला) – चिंचमंडळ, दांडगाव, नवरगाव, शिवनाळा, वरुड, गोदनी, हटवांजरी, घोगुलदरा, अर्जुनी, घोडदरा, गोंडबुरांडा, बोरी (खु), खडकी बुरांडा, डोल डोंगरगाव, पिसगाव
अनुसुचित जमाती सर्वसाधारण – कोथुर्ला, देवाळा, खंडणी, वागदरा, सगनापूर, जळका, बोटोणी, सराटी, नरसाळा, कान्हाळगाव, मछिंद्रा, चिंचाळा, म्हैसदोडका, पहापळ
हे देखील वाचा:
वणी शहरात छुप्या मार्गाने फोफावतोय देहविक्री व्यवसाय (भाग – 1)