वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना शासनाची आर्थिक मदत

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते 15 लाखांचा धनादेश सुपुर्द

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पिवरडोल येथील वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या 17 वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांना शासनाची मदत मिळाली आहे. दिनांक 21 जुलै रोजी वनविभागातर्फे आलेला मदतीचा 15 लाखांचा धनादेश आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते मृताच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला आहे.

दिनांक 9 जुलै रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास पिवरडोल शेतशिवारात शौचास गेलेल्या अविनाश पवन लेनगुरे या तरुणावर वाघाने हल्ला करून ठार केले होते. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास या घटनेचा प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडवली होती. घटनेची माहिती मिळताच आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार तात्काळ घटनास्थळी हजर झाले होते.

अविनाशच्या मृत्यूमुळे गावकरी संतप्त झाले होते. लेनगुरे कुटुंबियांच्या वतीने आमदार बोदकुरवार यांनी वन विभागाच्या अधिका-यांसमोर विविध मागण्या अधिका-यांसमोर उपस्थित केल्या होत्या. तसेच या मागणींचा पाठपुरावा केला होता. या मागणीतील आर्थिक मदतीची मागणी मंजूर झाली असून इतर कुटुंबीयांना नोकरी तसेच गावाला कुंपनाची मागणीसह इतरही काही आश्वासने अद्याप पूर्ण होणे बाकी आहे.

धनादेश वाटप करतेवेळी पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार, वन परिक्षेत्राधिकारी एस. बी. मेहेरे, सरपंच सुरेखा सुनिल निकोडे, उपसरपंच मोहन केशव गुरणुले, पोलीस पाटील उत्तम भोयर, दिगाबंर धांदे, सचिन दुम्मनवार, विपीन ऐनवार, वन कर्मचारी गुजर, पिकलिकवार व पिवरडोल येथील नागरिक उपस्थित होते.

आमदारांनी जाणून घेतल्या गावक-यांच्या समस्या
कार्यक्रमानंतर आमदारांनी पिवरडोल गावक-यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. गावठाणमध्ये वाढीव पोल टाकणे, सिमेंट रोड, नालीचे बांधकाम, पाण्याची व्यवस्था, अतिक्रमण इत्यादी समस्यां गावक-यांनी सांगितल्या. या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जाईल असे आश्वासन यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिले.

हे देखील वाचा:

झरी तालुक्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

वणीतही पावसाचा कहर, ठिकठिकाणी साचले पाणी…

Leave A Reply

Your email address will not be published.