मुकुटबन सबस्टेशनमध्ये लागली आग

लाईनमन व कामगारांच्या सातर्कतेमुळे हानी टळली

0

सुशील ओझा, झरी: परिसरातील 25 ते 30 गावात वीज पुरवठा मुकुटबन येथील 33 केवी सबस्टेशनवरून केला जातो. विविध गावांकरिता वेगवेगळे फिडर देण्यात आले आहे. 24 एप्रिलला दुपारी 2 वाजता दरम्यान मांगली फिडर बंद झाला. त्यामुळे त्या फिडरवरील काही गावातील लाईन बंद पडली. सबस्टेशनवरील ऑपरेटर गजानन कुंटावार यांच्या लक्षात आले.

त्यांनी मांगली फिडर चालू केला. परंतु लाईन सुरू झाली नाही. त्यामुळे काही वेळ थांबून दुसऱ्यांदा पुन्हा सुरू केले असता सबस्टेशनच्या परिसरातील मांगलीकडे जाणाऱ्या खांबावर स्पार्किंग झाली. जळलेला पक्षी जमिनीवर पडला व सबस्टेशनच्या वॉल कंपाउंड जवळील असलेला कचरा व लहान झाडे झुडपे जळण्यास सुरवात झाली. जळता जळता सबस्टेशनच्या आतील परिसरात ही आग पोहचली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

काडी कचरा जळण्यास सुरवात झाली व आग संपूर्ण सबस्टेशनला घेरणार तर नाही ना असे वाटत असताना ऑपरेटर कुंटावार यांनी ही गोष्ट वरिष्ठ अधिकारी यांना संगीतली. लाईनमन यांना फोन करून बोलाविले. आरसीसीपीएल कंपनीतील अग्निशमनदलालासुद्धा पाचारण केले. लाईनमन सोपान याने झाडे तोडण्याकरिता आलेल्या मजुरांना घेऊन त्वरित पोहचला. तसेच लाईनमन अवघन, राहुल निंदेकर, सागर पानघाटे व परमेश्वर लाकडे पोहचले. पाणी मारून संपूर्ण आग विजविली. सदर घटनेत कोणतीही हानी झाली नाही.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.