बाजीराव महाराज वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची भेट

इनरव्हील क्लब व प्रयास ग्रुपचा संयुक्त उपक्रम

0

जितेंद्र कोठारी, वणी: ‘ओंजळ भासते छोटी, पण असते खूप मोठी’ हे वाक्य आपण खूप वेळा ऐकले असेल. मात्र या वाक्यातील भावार्थ आपल्याला आयुष्यातील एका पायरीवर नक्कीच उमगतो. ही ओंजळ जर माणुसकीची असेल, तर त्याचा गंध काही औरच असतो. अशीच माणुसकीने भरलेली ‘ओंजळ’ इनर व्हील क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी तर्फे शनिवार दि. 3 जुलै रोजी येथील बाजीराव महाराज वृद्धाश्रममध्ये राहणाऱ्या वृद्धांना जीवनावश्यक वस्तू भेट देऊन भरण्यात आली. तसेच इनरव्हील क्लब सदस्या डॉ. पूनम राठोड व डॉ. निशा सूर यांनी वृद्धाश्रम मधील वृद्धांची मोफत आरोग्य तपासणी करून औषध दिले.

या वेळी प्रयास या सोशल ग्रुपचे सदस्य अनन्य चिंडालिया याचा वाढदिवस निमित्त वृद्धाश्रमला घड्याळ व इतर साहित्य भेट देण्यात आले. तसेच बाजीराव महाराज वृद्धाश्रमचे संचालक सुहास नांदेकर व स्मिता नांदेकर यांचा शाल श्रीफळ देऊन इनरव्हील क्लबतर्फे सत्कार करण्यात आले. इनर व्हील क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटीच्या अध्यक्षा श्रुती श्रीकांत उपाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विजय चिंडालिया, दीपक गढवाल, सुहास नांदेकर, यशवंत बोंडे, स्मिता नांदेकर, पूजा गढवाल, अंजुला चिंडालिया, डॉ. पूनम राठोड, डॉ. निशा सूर, आरती ढवस प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी प्रयास ग्रुपचे सदस्य आदित्य चिंडालिया, रिषभ मुणोत, सागर जाधव, प्रीती कोचेटा, प्रीया कोचेटा, रोशन जैन, मिताली कोचेटा व शुभम जोबनपुत्रा यांनी प्रयत्न केले.

हे देखील वाचा:

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

वणीतील रविनगर येथील घर (ड्युप्लेक्स) विकणे आहे

पावसाळा आला… चला झाडे लावुया, पर्यावरण वाचवुया

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.