ग्रामीण पत्रकार संघ मारेगाव शाखेची कार्यकारणी गठीत
अध्यक्षपदी माणिक कांबळे तर सचिवपदी नागेश रायपुरे
बहुगुणी डेस्क: स्व. पी.एल. शिरसाठ प्रणीत ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. स्थानिक विश्रामगृहात 4 जानेवारी रोजी पत्रकार संघटनेची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्षपदी माणिक कांबळे, उपाध्यक्षपदी देवेंद्र पोल्हे तर सचिवपदी नागेश रायपुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच सल्लागारपदी प्रा. डॉ. माणिकराव ठिकरे, कार्याध्यक्षपदी अशोक कोरडे, कोशाध्यक्ष म्हणून उमर शरीफ, सहसचिव दिलदार शेख, प्रसिद्धी प्रमुख श्रीधर सिडाम तर रमेश झिंगरे, सुरेश नाखले, बंडू डुकरे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. बैठकीचे सूत्रसंचालन संघटनेचे माजी सचिव रमेश झिंगरे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष अशोक कोरडे यांनी मानले.
6 जानेवारी रोजी पत्रकार संघटनेतर्फे उपक्रम
नुकतिच गठीत झालेल्या कार्यकारिणीच्या नेतृत्वात उद्या दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील जळका येथील लक्ष्मीबाई मोघे विद्यालयातील अनाथ विद्यार्थ्यांना भोजन व मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरात ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने शहरात सांस्कृतिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. धुलीवंदनाच्या दिवशी सलग तीन वर्षे हस्यकलोळ हा कार्यक्रम घेण्यात आला होता. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रमजान महिन्यात रोजे असलेल्या मुस्लिम बांधवाना ईफ्तार पार्टी, रुग्णांना फळे वाटप, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना अन्न धान्य, किराणा किट, मास्क वाटप आदी सामाजिक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: