मुकुटबन येथे गरोदर महिलांना कोविड लशीबाबत मार्गदर्शन

आरसीसीपीएल कंपनीतर्फे शिबिराचे आयोजन, महिलांनी घेतली लस

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील ग्रामीण भागात गरोदर महिलांनी कोविड लस घ्यावी की नाही याबाबत विविध संभ्रम निर्माण झाले आहे. सदर बाब लक्षात घेऊन आरसीसीपीएल कंपनीद्वारा गरोदर महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कंपनीच्या महिला डॉक्टरांनी उपस्थित महिलांना याबाबत मार्गदर्शन केले. मुकुटबनच्या सरपंच मीना आरमुरवार, अडेगावच्या सीमा लालसरे, पिंपरडचे महेंद्र आवते व येडशी येथील धोटे यांच्या सहकार्यातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

गरोदर महिलांना लस घेण्याबाबत विविध गैरसमज आणि भीती आहे. यावेळी लस आणि मासिक पाळी, स्तनपान इत्यादी विषयी डॉक्टर नेहा जनरोडे यांनी मार्गदर्शन केले. यामुळे गरोगर महिलांच्या मनातील गैरसमज दूर झाले. यावेळी अनेक गरोदर महिलांनी लसीकरण केले. डॉक्टर नेहा जनरोडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी वनश्री वनकर (CSR, RCCPL) यांच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका विजया परसावार, मीना गडेवार, बबिता मुद्दमवार, स्वाती ताडकोंडावार , सपना काटकर, संध्या टेकाम, तेजस्विनी आवते, संगीता गागरे, भावना वराटे यांनी परिश्रम घेतले. सदर शिबिरासाठी आरसीसीपीएलचे मुकुटबन युनिट प्रमुख अभिजित दत्ता, नवीन काकडे व एच आर प्रमुख जयंत व्यास यांचे देखील मार्गदर्शन लाभले.

हे देखील वाचा:

मटका अड्यावर धाड पडताच शौकिन पसार

भामट्याने लंपास केले वृद्ध महिलेचे 20 हजार, कायर येथील घटना

सालगड्याची पत्नी घरी एकटी असताना मालकाने केला विनयभंग

Leave A Reply

Your email address will not be published.